---Advertisement---

शेजारील महिलेला अश्लील फोटो पाठवले अन् झाला फरार; निष्पाप आईला गमवावा लागला जीव, नेमकं काय घडलं ?

---Advertisement---

Crime News : मुलाने केलेल्या एका चुकीमुळे आईला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झालं असं की, या तरुणाने घराशेजारी राहणाऱ्या विवाहित महिलेला तिच्या व्हॅट्सऍपवर अश्लील फोटो आणि मेसेज पाठविले. हे पाहून संतापलेल्या विवाहित महिलेच्या पतीने थेट तरुणाचे घर गाठले. मात्र, तो घरी नसल्याने त्याच्या आईसोबत वाद झाले. वाद विकोपाला जाऊन तरुणाच्या आईला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत अति रक्तस्त्राव झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मात्र या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

भंडारा जिल्हयातील लाखांदूरच्या जैतपूर-बारव्हा गावात ही घटना घडली. सोपान खोब्रागडे (३५) असे आरोपीचे तर सुनाबाई घटारे (४५) असे मयत महिलेचे नाव आहे. तरुणाने घराशेजारी राहणाऱ्या विवाहित महिलेला तिच्या व्हॅट्सऍपवर अश्लील फोटो आणि मेसेज पाठविले. हे पाहून संतापलेल्या विवाहित महिलेच्या पतीने थेट तरुणाचे घर गाठले. मात्र, तो घरी नसल्याने त्याची आई सुनाबाईसोबत सोपान याचे वाद झाले.

वाद विकोपाला जाऊन सोपान याने तरुणाची आई सुनाबाई हिला लाकडी लाठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत सुनाबाई हिचा अति रक्तस्त्राव झाल्याने तिचा लाखांदूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर सोपान खोब्रागडे याने दिघोरी मोठी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मात्र या थरारक घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

पैशांची मागणी करीत विवाहितेचा छळ

जळगाव : पैशांची मागणी करण्याच्या कारणावरून हरिता नितीन पाटील (रा. मालखेडे, ता. एरंडोल, ह. मु. द्रौपदी नगर) या विवाहितेचा छळ केला. तसेच विवाहितेसोबत वेळोवेळी भांडण करून तिला आत्महत्या करण्याची धमकीदेखील दिली. मुलाच्या शिक्षणासाठी वारंवार माहेरून पैशांची मागणी करीत छळ करीत होते. हा छळ असह्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास महिला पोलीस नाईक सुवर्णा तायडे या करीत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment