---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक सीरियल किलर पोलिसांच्या हाती लागला असून, त्याने आतापर्यंत दोन महिलांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. सुदैवाने, तिसरी महिला त्याच्या तावडीतून सुटल्यामुळे हा सिरीयल किलर पोलिसांच्या हाती लागला आहे. अनिल संदानशिव असे अटक सीरियल किलरचे नाव आहे.
पोलीस सुत्रानुसार, अनिल सदाशिव हा प्रथम विवाहित महिलांना आपल्या जाळ्यात अडकवत असे. तो गोड बोलून त्यांच्या जवळ जायचा आणि नंतर त्यांना आपल्यासोबत जंगलात घेऊन जायचा. तिथे महिलांना लुटायचा, त्यांच्यावर अत्याचार करायचा आणि नंतर दगडांनी ठेचून हत्या करत असे. गेल्या एका महिन्यात त्याने अशा प्रकारे दोन महिलांना आपले बळी बनवले होते.
तिसऱ्या महिलेला मारण्याचा प्रयत्न
तिसऱ्या घटनेत आरोपीने एका महिलेला अडकवले आणि तिलाही जंगलात नेले. त्याने या महिलेलाही मारण्याचा प्रयत्न केला मात्र, ती त्याच्या तावडीतून कशीतरी सुटली आणि आरोडाओरड केली. आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ धाव घेतली. आरोपी अनिल सदाशिवला ताब्यात घेत, पोलिसांच्या स्वाधीन केले.
आरोपी पोलिस कोठडीत
पोलिसांनी आरोपी अनिल सदाशिवला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे. ज्या जंगलात त्याने पीडितांचे मृतदेह फेकले होते तिथे पोलिसांचे पथक शोध मोहीम राबवत आहे.
आरोपीने दोनपेक्षा जास्त महिलांची हत्या केली आहे का? याचाही तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालीची तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.