---Advertisement---
भुसावळ, प्रतिनिधी : आमोदा मोर नदिच्या पुलावर अपघाताची मालिका सुरूच आहे. दरम्यान, आज रविवारी सकाळी पुन्हा मजुरांनी भरलेली एक आयशर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात २३ मजूर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सावदा येथील गोविंद शेठ यांच्या केळी ग्रुपची आयशर गाडी क्रमांक एम एच 43 Y. 05 74 ही आमोदा येथील मोर नदी पुलावर सकाळी साडे सात ते आठच्या दरम्यान पलटी होऊन अपघात झाला.
गाडी रोझोदा गाते, सावदा , निंभोरा कळमोदा कोचुर नंतर हिंगोणा, भोकर, खिरोदा , येथील केळी वाहतूक करणारे कर्मचारी यांना जामनेर केळी काढण्यासाठी गाडी जात होती. दरम्यान, मोर नदी पुलावर गाडी पलटी झाली. यात 23 कामगारांच्या फैजपूर येथील एक्सीडेंट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जखमींचे नाव
सलीम तडवी हिंगोणा, हुसेन तडवी सावदा, संजय पाटील रोझोदा , फिरोज तडवी सावखेडा पवन मेढे रोझोदा ,फकीरा तडवी खिरोदा ,राजू तडवी रोझोदा , सादिक तडवी , अकसन तडवी हिंगोणा आशिक तडवी हिगोणा, भास्कर मेढे रोझोदा ,शादिक तडवी हिगोणा, साकीत तडवी हिगोणा, सुरेखा अटकाडे रोझोदा, संजय अटकाडे रोझोदा ,चंद्रकांत तायडे रोझोदा, आशा पाटील रोझोदा, देवराज लहासे भोकरी, अमित तडवी हिगोणा , सरला तायडे रोझोदा,पिंटु तायडे गाते ,महेंद्र तायडे कोचुर, सलीम तडवी कळमोदे.
दरम्यान, केदार लक्झरी गाडी क्रमांक एम एच 19 वाय 57 46 गर्दीतून पुढे काढताना लक्झरी गाडीने मोटरसायकल क्रमांक एम एच 19 ए डब्ल्यू 94 48 या मोटरसायकलला धडक दिली. यात वासुदेव फेगडे वय 35 व आमोदा येथील किरण पाटील यांच्या मोटरसायकलला धडक दिल्याने त्यांच्या दोघांच्या पायांना जबर दुखावत झाली आहे.








