मुक्ताईनगर : भुसावळजवळील मुक्ताईनगर तालुक्यातील एका ३४ वर्षीय तरुणाने गंभीर आजाराला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले आहे. मयत तरुणाचे नाव दिपक अशोक इंगळे (वय-३४) असे आहे, याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुरनाड येथे दिपक इंगळे हा आपल्या नातेवाईकसह राहतो. तो मजुरीचे काम करून आपली जीविका भागवत होता.
गेल्या काही महिन्यांपासून त्याला गंभीर आजराने त्रासले होते. त्याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांपासून तो घरीच होता. त्यात त्याला या दुर्धर आजारामुळे अतिशय त्रास होत होता.या गंभीर आजाराला कंटाळून १९ सप्टेंबर रोजी रात्री दीड ते सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान गावातील पाणीपुरवठा करण्याच्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक धमेंद्र ठाकूर करीत आहे.