---Advertisement---
पाचोरा : तालुक्यातील शिंदाड गवले या गावांमध्ये अतिवृष्टी सदृश झालेल्या पावसामुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली. यात १ अनेक गुरढोर यांचा मृत्यू झाला सर्व घरांमध्ये पुराचे पाणी शिरले घरांचे भरपूर नुकसान झाले असून घरातील सर्वसामग्री अस्तव्यस्त चिखल मातीत खराब झाले आहे. यामुळे तेथील स्थानिक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेतर्फे या गावात फूड पॅकेट, चटई व पाणी बॉटल वितरित करण्यात आली.
शिंदाड गवले या गावात विश्व हिंदू परिषदेत सेवा विभागातर्फे 800 फूड पॅकेट तसेच एक हजार चटया , 2 हजार 500 पाण्याच्या बॉटल देण्यात आले. चटया हे जळगाव एमआयडीसीमधील उद्योजक तुषार पटेल व जयंतीभाई पटेल यांनी दिल्या. तसेच तेथील ग्रामस्थांसाठी काल संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था देखील विश्व हिंदू परिषदेमार्फत करण्यात आली. या उपक्रमामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या सेवा विभागाने पुढाकार घेतला असून या जीवनावश्यक सामग्री जमा करून त्याठिकाणी पोहचवणार आहेत.
या उपक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री ललित चौधरी , जिल्हा उपाध्यक्ष खंडू पवार, प्रांत सह संपर्क प्रमुख समीर साने, जिल्हा सह मंत्री राजेंद्र गांगुर्डे, सह सेवा प्रमुख दीपक दाभाडे, राकेश लोहार, हरीश कोल्हे, ललित खडके, संतोष इंगळे, सुनील आहेर आदी उपस्थित होते.