---Advertisement---

मुलाखत द्यायला निघाले; मात्र, वाटेत काळ आडवा आला, अख्खं गाव सुन्न

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । १८ मे २०२३। नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका खासगी कंपनीत मुलाखतीसाठी जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचाही मृत्यू झाला.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सुषमा वाघाडे, प्रतीक्षा वाघाडे आणि रोशन साहारे हे तिघेही एका खासगी कंपनीत मुलाखातीकरीता जात होते. चमेली गावातून शिवा गावाकडे दुचाकीने जात असताना नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर चकडोह गावाजवळ गुरवारी सकाळी नागपूर अमरावती मार्गावर मागून येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. सारी स्वप्न तशीच अधुरी ठेवत तिघांनीही जगाचा निरोप घेतला. एकाच वेळी गावातील तिघांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने गावात दु:खद वातावरण आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment