---Advertisement---

Jalgaon News : एचआयव्ही ग्रस्त बालकांना सेवारथ संस्था देतेय बळ !

---Advertisement---

जळगाव : सेवारथ संस्था व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (११ जून) रोजी सकाळी १०.३० वाजता भारतीय जैन संघटना सभागृह, भास्कर मार्केट येथे एचआयव्ही ग्रस्त बालकांना पोषण आहार वाटप करण्यात आले. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे, सचिव डॉ. भरत बोरोले, सेवारथ संस्थेच्या अध्यक्षा नीलिमा शेठीया आदी उपस्थित होते.

गेल्या १५ वर्षांपासून सेवारथ संस्था गरीब, गरजू व एचआयव्ही ग्रस्त बालकांसाठी कार्यरत आहेत. मुंबई नंतर जळगावात एचआयव्ही ग्रस्त बालकांची संख्या वाढली आहे. सेवारथ संस्थेतर्फे या एचआयव्ही ग्रस्त बालकांना दर महिन्याला पोषण आहार वाटप करण्यात येत असून, आतापर्यंत शंभरहुन अधिक बालकांनी याचा लाभ घेतला आहे. विशेषतः कोरोना काळात देखील ही सेवा सुरू होती, अशी माहिती सेवारथ संस्थेच्या अध्यक्षा नीलिमा शेठीया यांनी दिली.

गरजूंना शिलाईन मशीन

याशिवाय ५० ते ६० गरजूंना लोकांना शिलाईन मशीन वाटप करण्यात आले आहेत. तसेच ज्यांना मेडिकल फॅसिलिटीची गरज भासली, अश्या लोकांना मेडिकल फॅसिलिटीची मदत करण्यात आली. तसेच सेवारथ संस्थाने जवळपास पाच हजारहून अधिक झाडे लावली आहे. पाच वसतिगृह तयार केले आहे. महाराष्ट्रात जेव्हा दुष्काळ जाहीर करण्यात आला होता, त्यावेळी दोन बोरिंग (वेल) खोदण्यात आले आहेत, अशी माहितीही सेवारथ संस्थेच्या अध्यक्षा नीलिमा शेठीया यांनी दिली.

दरम्यान, या सेवारथ कार्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती जुडले गेले असून, या गरजू लोकांसाठी मदत कर्त्यांनी पुढे यावे, असे आवाहन सेवारथ संस्थेच्या अध्यक्षा नीलिमा शेठीया यांनी केले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment