जळगाव : जळगाव जिल्ह्यातून चोरी केलेल्या सात मोटार सायकली नशिराबाद पोलिसांनी जप्त केल्या. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस तपासात त्याच्याकडून अजून काही गुन्ह्यांच उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नशिराबाद येथील खालची अळी भागातील प्रणव पाटील यांची दुचाकी (एमएच १९ डीएम ८२५३) ६ जून रोजी चोरीस गेली होती. याबाबत गुन्हा दाखल होता. सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी पथकातील अंमलदार पोहेकॉ युनूस शेख, पोहेको शिवदास चौधरी, पोहेकॉ राजेंद्र ठाकरे, पोको भरत बाविस्कर, पोकों पंकज सोनवणे, पोको सागर विडे, पोको प्रवीण लोहार, चापोना अजित तडवी यांना तपासाच्या सूचना दिल्या. पथकाने संशयित शाहबाज शेख अब्दुल रहेमान (वय २४, रा. नशिराबाद) यांस ताब्यात घेवून चौकशी केली.
त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास १ जुलै रोजी अटक करण्यात आली. सदर आरोपीने नशिराबाद, रामानंद नगर, शनिपेठ पोलिस ठाणेअंतर्गत चोरलेल्या ३ मोटारसायकलींची कबुली देवून जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यातील सात मोटारसायकल काढुन दिल्या आहेत. गुन्ह्याचा तपास हवालदार राजेंद्र ठाकरे हे करीत आहेत.