शहादा पोलिसांची मोठी कामगिरी: चोरीच्या ५ मोटारसायकली जप्त, एका आरोपीला अटक

---Advertisement---

 

शहादा : शहादा पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत चोरीला गेलेल्या पाच मोटारसायकली हस्तगत केल्या असून, एका आरोपीला अटक केली आहे. या मोटारसायकलींची एकूण किंमत १ लाख १९ हजार रुपये आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय पाटील यांची हिरो कंपनीची मोटारसायकल (क्र. MH 39 AA 4211) सोनवद, ता. शहादा येथून चोरीला गेली होती. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना, पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चोरीला गेलेली मोटारसायकल मंदाणे, ता. शहादा येथे एका व्यक्तीकडे आहे.



या माहितीच्या आधारे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देसले यांनी डी.बी. पथकाचे प्रमुख पोउपनि भुनेश मराठे यांना कारवाईसाठी पाठवले. पोलिसांनी मंदाणे येथे जाऊन खात्री केली असता, त्यांना संशयित व्यक्ती दुचाकीसह सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव सुकदेव साईनाथ तडवी (वय २५, रा. बिजरीगव्हाण, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) असे सांगितले. चौकशीदरम्यान, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पण पोलिसांनी विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याने सोनवद येथून मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. याशिवाय, त्याने आणखी काही मोटारसायकली चोरल्याचेही कबूल केले. त्याने चोरीच्या मोटारसायकली सोनवद गावातील एका शेतात लपवून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन तपास केला असता, तिथे चार मोटारसायकली मिळून आल्या. अशा प्रकारे, पोलिसांनी आरोपीकडून एकूण पाच मोटारसायकली हस्तगत केल्या.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस. , अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक निलेश देसले, पोउपनि भुनेश मराठे, पोउपनि प्रदीप राजपूत, पोहेकाँ योगेश थोरात, साहेबराव खांडेकर, दिपक चौधरी, पोकाँ भगवान सावळे आणि प्रदीप वाघ यांचा समावेश होता.
या कामगिरीमुळे शहरात मोटारसायकल चोरांचे जाळे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या संदर्भात अधिक तपास सुरू आहे.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---