---Advertisement---

भारत-पाकिस्तान सामना रद्द ; शाहिद आफ्रिदी संतापला, पहा व्हिडिओ

---Advertisement---

WCL 2025 : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सचा दुसरा हंगाम सुरु आहे. यात इंडिया चॅम्पियन्सचा पहिला सामना २० जुलैला पाकिस्तानसोबत होणार होता. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली आहे. यामुळे हरभजन सिंग, इरफान पठाण, युसुफ पठाण, शिखर धवन, सुरेश रैना आणि युवराज सिंग यांनी खेळण्यास नकार दिल्याने, हा सामना थेट रद्द करावा लागला. दरम्यान, हा सामना रद्द झाल्यानंतर शाहिद आफ्रिदी संताप व्यक्त केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाहिद आफ्रिदी म्हणाला की आम्ही WCL मध्ये क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहोत. जर भारताला आमच्याविरुद्ध खेळायचे नव्हते, तर त्यांनी येथे येण्यापूर्वी नकार द्यायला हवा होता. परंतु, भारतीय खेळाडू केवळ आले नाहीत, तर सरावही केला आणि नंतर अचानक खेळण्यास नकार दिला. आफ्रिदीने पुढे त्याचा राग गायला, जे तो अनेकदा गातो. तो म्हणाला की क्रिकेटला राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे.

---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान संघांमधील सामना २० जुलै रोजी WCL २०२५ मध्ये बर्मिंगहॅम येथे होणार होता. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, शाहिद आफ्रिदी देखील भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार देण्याचे कारण आहे. कारण पहलगाम हल्ल्यादरम्यान हा महान पाकिस्तानी क्रिकेटपटू त्याच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत होता.

भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत एकमेकांसमोर आले तर काय होईल?

भारतासोबतचा सामना रद्द झाल्यानंतर, पाकिस्तान चॅम्पियन्स संघाच्या मालकाने सांगितले की, त्यांना पूर्ण २ गुण मिळाले याचा त्यांना आनंद आहे, जे त्यांना पात्र होते. त्यांनी सांगितले की, भविष्यातील सामने वेळापत्रकानुसार होतील. बाद फेरीत, आम्ही भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार नाहीत याची खात्री करण्याचा प्रयत्न करू. हे दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचतील की नाही याचा निर्णय त्यावेळी घेतला जाईल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---