---Advertisement---

दिल्ली महानगरपालिकेच्या ‘या’ आहे नव्या महापौर

---Advertisement---

नवी दिल्लीः दिल्ली महानगर पालिकेच्या महापौर पदासाठी आज बुधवारी निवडणूक पार पडली. आम आदमी पार्टीच्या उमेदवाराने यात दणदणीत विजय मिळवला असून भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे.

महापौर पदासाठी आम आदमी पार्टीकडून शैली ओबेरॉय यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर भाजपकडून रेखा गुप्ता यांनी उमेदवारी दाखल केलेली. महापौर निवडीत आपच्या उमेदवार शैली ओबेरॉय यांचा विजय झाला. शैली ओबेरॉय यांना १५० मतं मिळाली तर भाजप उमेदवार रेखा गुप्ता यांना ११६ मतं मिळाली.

दरम्यान, यावेळी नव्या महापौर डॉ. शैली ओबेरॉय यांनी आपण सभागृह संविधानानुसार चालवू असं आश्वासन दिलं. आपण सर्व सभागृहाची गरिमा राखून काम करु, अशी मला आशा असल्याचं ओबेरॉय म्हणाल्या.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment