माजी कर्णधार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी!

#image_title

Shakib Al Hasan : बांगलादेशी क्रिकेटपटू शाकिब अल हसन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आयएफआयसी बँकेचा चेक बाउंस झाल्याप्रकरणी ढाका न्यायालयाने शाकिब विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. ढाका न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट झियादुर रहमान यांनी रविवारी हा आदेश दिला.

चेक बाउंस प्रकरणातील गुन्हा

शाकिबच्या अल हसन ॲग्रो फार्म लिमिटेड कंपनीने आयएफआयसी बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी चेक दिले होते. मात्र, निधी अपुरा असल्याने चेक बाउंस झाले. याप्रकरणी १५ डिसेंबर रोजी शाकिबचे नाव समोर आले होते. १८ डिसेंबर रोजी त्यांना १९ जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आदेश न पाळल्यामुळे अटक वॉरंट जारी करण्यात आले. या प्रकरणात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गाझी शहागीर हुसेन व अन्य संचालकांनाही गुन्ह्यात सामील करण्यात आले आहे.

हेही वाचा : विद्येच्या मंदिरात चाललंय तरी काय ! शाळेच्या कार्यालयात शिक्षक-शिक्षिकेचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

शाकिबवर याआधीही गंभीर आरोप

शाकिबवर यापूर्वीही विद्यार्थी आंदोलनादरम्यान खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचप्रमाणे, अवामी लीगचे माजी खासदार असल्याच्या काळातही त्याच्यावर अटक वॉरंट निघाले होते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बंदी

शाकिबवर अनधिकृत बॉलिंग अॅक्शनमुळे इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाने बंदी घातली आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये तो सहभागी होऊ शकत नाही.

यूएसमध्ये स्थायिक 

बांगलादेशमधील अस्थिरतेच्या वातावरणामुळे शाकिब सध्या कुटुंबासह यूएसमध्ये स्थायिक झाला आहे. वादांमुळे त्याचे क्रिकेट करिअर संकटात आले असून, त्याचा बांगलादेश क्रिकेट संघावरही परिणाम होत आहे.