अखेर शामकांत सोनवणेंचा सभापतीपदाचा राजीनामा

---Advertisement---

 

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शामकांत सोनवणे यांच्याविरूध्द संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. मात्र सभापती निवडीच्या सभेच्या पूर्वसंध्येलाच शामकांत सोनवणे यांनी सभापती पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांच्याकडे दिल्याने या घडामोडींना जाता ब्रेक लागला आहे. दरम्यान नव्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीसाठी संचालकांशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशी माहिती पॅनल प्रमुख तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी सभापती शामकांत सोनवणे यांच्याविषयी नाराजी व्यक्त करीत जिल्हाधिका-यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या घटनेने जळगाव बाजार समितीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. होती. दरम्यान ज्या संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला ते सहलीवर देखिल रवाना झाले होते. सभापती पदाच्या अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी मंगळवारी १९ रोजी विशेष सभा बोलावण्यात आली होती.

मात्र या सभेच्या पूर्वसंध्येलाच म्हणजेच सोमवारी नाट्यमय घडामोडी घडल्या आणि शामकांत सोनवणे हे देवकरांच्या भेटीसाठी मजूर संस्थेच्या कार्यालयात दाखल झाले. राजीनाम्यानंतर देवकरांची भेट पॅनलप्रमुख गुलाबराव देवकर यांची भेट घेण्यापूर्वीच शामकांत सोनवणे यांनी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांच्याकडे सभापती पदाचा राजीनामा सादर केला. बलसाणे यांनी तो मंजूरही केला.

त्यानंतर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत माहिती देतांना देवकर यांनी सांगितले की, शामकांत सोनवणे यांच्याविरूध्द गैरसमजातून अविश्वास प्रस्ताव दाखल झाला आहे. त्यांच्या समवेत आमची चर्चा सुरू होती. १९ ऑगस्ट रोजी बैठक घेऊन राजीनाम्याविषयी चर्चा देखिल होणार होती. परंतु तत्पुर्वीच संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केला. संचालकांमध्ये काही जणांना सभापती आणि उपसभापती होण्याची अपेक्षा होती. म्हणूनच हा प्रस्ताव दाखल झाला. मात्र आज शामकांत सोनवणे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता संचालक सहलीवरून आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून सभापती आणि उपसभापती पदाचा निर्णय घेतला जाईल, असे गुलाबराव देवकर यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेस लिलाधर तायडे, रवींद्र शिंदे, पंकज महाजन यांच्यासह बाजार समितीचे भाजपाचे संचालक उपस्थित होते.



आजची सभा लांबणीवर

शामकांत सोनवणे यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या अविश्वास प्रस्ताव प्रकरणी मंगळवारी १९ रोजी विशेष सभा बोलावण्यात आली होती. मात्र त्यांनी राजीनामा दिल्याने ही सभा आता लांबणीवर पडली असून सहायक निबंधक धर्मराज पाटील यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी सांगितले. येत्या दहा दिवसात ही विशेष सभा बोलावली जाण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---