तरुण भारत लाईव्ह । जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत आज नाट्यमय घटना घडल्यानंतर सभापतीपदी शामकांत सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. सोनवणे यांना १५ मते मिळवून ते बाजार समितीचे सभापती बनले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले लक्ष्मण पाटील उर्फे लकी टेलर यांनी माघारीसाठी आपल्यावर इतर संचालकांनी दबाव आणल्याचा गौप्यस्फोट केल्याने बाजार समितीच्या निवडणुकीत मविआमधील वाद उफाळून आल्याचे दिसून आले. मात्र गुलाबराव देवकर यांनी शामकांत सोनवणे व लकी टेलर यांच्या मनोमिलन घडवून आणले. यानंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी महाविकास आघाडीत कोणतेही वाद नसल्याचे म्हटले आहे.