---Advertisement---

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी राहुल गांधींना हिंदू धर्मातून केले बहिष्कृत

---Advertisement---

Shankaracharya Avimukteshwarananda on Rahul Gandhi: ज्योतिर्मठचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) यांना हिंदू धर्मातून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. शंकराचार्यानी सांगितले कि आजपासून राहुल गांधींना हिंदू मानू नये.

राहुल गांधींनी संसदेत केला हिंदू धर्माचा अपमान

राहुल गांधींनी संसदेत मनुस्मृतीबद्दल विधान केले होते. शंकराचार्य यांनी यावर राहुल गांधींकडून स्पष्टीकरण मागितले होते. या संदर्भात त्यांना पत्रही पाठवण्यात आले होते परंतु तीन महिन्यांनंतरही राहुल गांधींकडून कोणतेही उत्तर आले नाही. आता शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी त्यांना हिंदू धर्मातून काढून टाकण्याची जाहीर घोषणा केली आहे.

ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद(Shankaracharya Avimukteswarananda) सरस्वती म्हणाले की, संसदेत मनुस्मृतीबद्दल राहुल गांधींनी दिलेल्या विधानाने संपूर्ण सनातन धर्म अनुयायी दुखावले आहेत. ते म्हणाले की, राहुल गांधींनी संसदेत हिंदू धर्माचा अपमान करत म्हटले होते की मी तुमच्या मनुस्मृतीवर विश्वास ठेवत नाही. मी संविधानावर विश्वास ठेवतो. तर वास्तव असे आहे की प्रत्येक हिंदू आणि सनातन धर्मीय मनुस्मृतीशी संबंधित आहे.

राहुल गांधींकडून पूजा करू नये

शंकराचार्य म्हणाले की, जेव्हा एखादी व्यक्ती सतत हिंदू धर्मग्रंथांचा अपमान करते आणि स्पष्टीकरण देण्यास टाळाटाळ करते तेव्हा त्याला हिंदू धर्मात स्थान देता येत नाही. त्यांनी स्पष्ट केले की आता राहुल गांधींना मंदिरांमध्ये विरोध केला पाहिजे आणि पुजाऱ्यांना आवाहन केले की त्यांनी त्यांना पूजा-पाठ करायला लावू नये कारण त्यांना आता स्वतःला हिंदू म्हणवण्याचा अधिकार नाही.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment