MAHARASHTRA POLITICS : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सर्व आमदार आणि मंत्र्यांनी शरद पवारांची दोनदा भेट घेतली. भेटीत शरद पवार यांनाही NDA च्या बैठकीला आणण्याचे प्रयत्न सुरू होते, पण शरद पवार यांचा मात्र त्याला विरोध होता.
काल दिल्लीत होणाऱ्या बैठकीसाठी शरद पवार यांना बोलावलं होतं. पण 2 दिवस राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना भेटून त्यांची मनधरणी करत होते, पण शरद पवार मात्र विरोधावर ठाम होते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
बातमी अपडेट होत आहे