तरुण भारत लाईव्ह । मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राचा दुसऱ्या भागाचे दि. २ मे रोजी प्रकाशन होणार आहे. त्यामुळे या पुस्तकात नेमक काय असेल , असे उत्सुकता सर्वाना होती. पवारांच्या या आत्मचरित्रात अजित पवार आणि देवेंद्र फडवणीस यांच्या पहाटेच्या शपथविधीवर गौप्यस्फोट करण्यात आला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना फूस लावल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडीचे पट उधळून लावण्यासाठी केंद्र सरकार आणि राजभवनाचा रडीचा डाव असल्याचे वक्तव्य या पुस्तकात करण्यात आले आहे.
तसेच या पुस्तकात पुर्वीच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबतच्या युती बद्दल लिहले आहे की, शिवसेनेचा वैचारिक पाया तितकासा भक्कम नाही. तसेच सेनेचा मुस्लिम विरोध टोकाचा नाही. त्यामुळे राजकारणासाठी शिवसेना राजकारणासाठी आवश्यक लवचिकता त्यांनी वेळोवेळी दाखवल्याचे या आत्मचरित्रात अजित पवारांनी लिहले आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीची जुळणी कशी झाली, शिवसेना भाजप अंतर वाढण्यामागे नेमकी कारणं काय यावर ही पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी का केला? शरद पवारांचा सल्ला घेतला होता का? याबद्दल अजित पवारांचा बंड आपल्याला आवडला नसल्याचे पवारांनी स्पष्ट शब्दात लिहले आहे. या पुस्तकात २०१५ ते २०२२ पर्यतच्या सर्व राजकीय घडामोडीचा आढावा शरद पवारांनी घेतला आहे.