‘पवार साहेब आणि मी एकत्र येणार हे खरे’, छगन भुजबळ यांनी स्पष्टच सांगितलं

#image_title

चाकण : येथील महात्मा जोतिराव फुले मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक कार्यक्रम पार पडणार आहे.

सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील नायगाव येथेही आज एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मात्र, अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचे समजते.

छगन भुजबळ यांचे भाष्य

छगन भुजबळ यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी पुणे आणि साताऱ्याला निघालो आहे. नायगावमधील सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी निधी मंजूर करून 10 एकर जागेत मुलींसाठी एनडीए प्रशिक्षण केंद्र उभारणार आहोत.” भिडे वाडा स्मारकाचे कामही प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्याबाबत विचारल्यास भुजबळ म्हणाले, “पवार साहेब आणि मी एकत्र येणार हे खरं  आहे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यांच्या कार्यक्रमासाठी आम्हा दोघांना आमंत्रित करण्यात आले आहे.”

अजित पवार यांची अनुपस्थिती

साताऱ्यातील कार्यक्रमाबाबत अजित पवार उपस्थित राहणार का, यावर छगन भुजबळ म्हणाले, “अजित पवार मुंबईत असतील तर येतील, अन्यथा बाहेर असल्यास ते येणार नाहीत.” या दोन्ही कार्यक्रमांनी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राजकीय नेत्यांच्या उपस्थितीला विशेष महत्त्व मिळाले आहे.