Sharad Pawar group : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना गुरुवारी जारी होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांच्याकडे सोपविला आहे . हा निर्णय पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का आहे. आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह ‘घड्याळ’ दिले आहे. आता शरद पवार गटाचा पक्ष राहिला नसून, नव्या पक्षाच्या स्थापनेसाठी त्यांना आज ४ नावे निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहेत.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष शिथिलता देत, आयोगाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव सांगण्यासाठी आणि तीन पर्याय देण्यासाठी बुधवारी दुपारी 4 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे.
आयोगाने शरद पवार यांना सांगितले आहे की, ते त्यांचा नवा पक्ष स्थापन करण्यासाठी आयोगाला कोणतीही ४ नावे देऊ शकतात. शरद पवार गटाकडून निश्चित केलेल्या पण अन् चिन्हांनी नाव समोर आली आहेत.
चिन्ह
कपबशी, सूर्यफूल, चष्मा आणि उगवता सूर्य
पक्षाचे नाव
शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी आणि शरद स्वाभिमानी पक्ष