Jalgaon News : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष कोण ? डॉ. सतीश पाटलांसह ‘हे’ आहेत इच्छुक

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जिल्हा बैठक रविवार, ७ रोजी आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बदलायचा कि ‘जैसे थे’ ठेवायचा याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष बदलण्याचा निर्णय झाला तर इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येतील विधानसभा निवडणूकीनंतर नवीन जिल्हाध्यक्ष तसेच कार्यकारिणी निवडण्यात येईल.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच बरखास्त करण्यात आली. माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या उपस्थितीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. तसेच जिल्हाध्यक्ष ऍड्. रवींद्र पाटील यांनीही आपला राजीनामा प्रदेशाध्यक्षाकडे पाठवला. मात्र त्यांच्याकडून राजीनामा स्वीकृतीबाबत कोणताही नर्णय मात्र कळवण्यात आलेला नाही.

दरम्यान, येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका असल्यामुळे जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करू नये, असा प्रस्तावही काही जणाकडून आला आहे. तर नवीन कार्यकारिणी करावी, असा प्रस्ताव काही जणांचा आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

माजी मंत्री अनिल देशमुख यांची उपस्थिती
याबाबत निर्णय घेण्यासाठी प्रदेश स्तरावरून जिल्हा संपर्क प्रमुख माजी अनिल देशमुख रविवार, ७ रोजी जळगावात येणार आहे. त्यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक होणार असल्याची माहिती जिल्हा महानगरप्रमुख अशोक लाडवंजारी, जिल्हा उपाध्यक्ष वाल्मीक पाटील यांनी दिली आहे. माजी मंत्री अनिल पाटील शनिवार दि. ६ जुलै रोजी ८ वाजता रेल्वेने जळगाव येथे येणार आहेत. सकाळी ९.३० वाजता आकाशवाणी चौकातील पक्षाच्या कार्यालयात बैठक होणार आहे. त्यानंतर ते ११ वाजता ते तेथून खिरोदा येथे कार्यक्रमास उपस्थिती देणार आहेत.

विधानसभा निवडणुकीवर चर्चा
जिल्हा संपर्कप्रमुख अनिल देशमुख यांच्या उपस्थीतीत आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीवरही चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी मतदार संघ निहाय आढावा घेण्यात येणार आहे.

असे आहेत इच्छुक
राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जिल्हाध्यक्ष ओबीसी गटातील असावा असा प्रस्ताव देण्य आला आहे. त्या दृष्टीने अनेक जण इच्छुक आहेत. यात माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, विकास पवार, विलास पाटील, वाल्मीक पाटील, अशोक लाडवंजारी यांच्या नावाचा समावेश आहे.