---Advertisement---

शरद पवारांची राष्ट्रवादी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर; कापूस, कांदे फेकून…

---Advertisement---

भुसावळ : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. येथील तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. तसेच कापूस, कांदे फेकून देत जोरदार घोषणाबाजी केली.

कापसाला व कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने भुसावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आक्रमक झाले. यावेळी शेतकऱ्यांसमवेत राष्ट्रवादीने तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढला. कापूस, कांदे फेकून देत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच तहसील कार्यालयासमोर ठेचा भाकरी खाऊन राज्य सरकारचा निषेध केला.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील , पक्षाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment