नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर करत आहात? तर मग हे नक्की वाचा!

तरुण भारत लाईव्ह न्यूज : नेटफ्लिक्सचा नवीन निर्बंधानुसार ग्राहकांना विनामूल्य सेवेसहीत अकाऊंट पासवर्ड शेअर करता येणार नाही. त्यासाठी अधिकची रक्कम मोजावी लागेल. आप्तेष्टांना पासवर्ड विनामूल्य शेअर करण्यासाठी भारत, क्रोएशिया, इंडोनेशिया आणि केनिया अशा अनेक देशात २० जुलैपासून हे निर्बंध लागू झाले आहेत. सद्यस्थितीत असलेल्या युजर्सला त्यांचे प्रोफाइल नव्या अकाऊंट ला ट्रान्स्फर करण्याची मुभा देण्यात आली आहे.

आर्थिक दृष्टीने हा बदल करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. कंपनीचा भाग भांडवलदारांचा उद्देशाने केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, कंपनीने आधीच वाजवी दरात सबस्क्रिप्शन ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहे. वाढत्या ओटीटी माध्यमांचा स्पर्धेत सबस्क्रिप्शन नवीन मेंबर्सला शेअर करण्यासाठी कंपनी परावृत्त करत आहे. वित्तीय दृष्टीकोनातुन आणि सदस्य संख्या वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे कळते.

२०२१ मध्ये नेटफ्लिक्स ने भारतीय बाजारपेठेत २० ते ६० टक्के पर्यंत सदस्य शुल्क कमी केले होते. यामुळे कंपनीला मागील दोन आर्थिक वर्षात मोठा फायदा झाला होता.