शष महापुरूष योग : ‘या’ राशींच्या लोकांसाठी असणार शुभ, मिळेल नशिबाची पूर्ण साथ

तरुण भारत लाईव्ह । १९ मे २०२३। जेव्हा जेव्हा शनिदेव आपली चाल किंवा दिशा बदलतात तेव्हा त्याचा व्यापक प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर होतो. वैदिक ज्योतिषात शनीला विशेष स्थान आहे.  2023 मध्ये शनिदेव स्वतःच्या राशीत कुंभ राशीत आहेत. 2025 पर्यंत या राशीत शनि राहील, त्यानंतर तो मीन राशीच्या प्रवासात असेल. शनी कुंभ राशीत असल्यामुळे शष महापुरुष राजयोग तयार झाला आहे. कुंभ राशीत बसलेल्या शनिने निर्माण केलेला शष महापुरुष चार राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होईल. तर कोणत्या आहेत त्या चार राशी जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

मेष रास
मेष राशीच्या लोकांवर शश महापुरुष योगाचा शुभ प्रभाव राहील. हा योग तुमच्यासाठी खूप भाग्यवान आणि अत्यंत फलदायी ठरेल. ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात चांगले यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी काळ चांगला आहे.

वृषभ रास
शष महापुरुष योग वृषभ राशीच्या लोकांना अनेक आव्हानांवर मात करण्यास मदत करेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगले यश मिळेल. तुमच्या सन्मानात चांगली वाढ होईल. तसेच तुमचा आत्मविश्वासही वाढेल.

कन्या रास
कन्या राशीच्या लोकांसाठी शष महापुरुष योग वरदानापेक्षा कमी नसेल. तुमच्या धैर्यात आणि पराक्रमात वाढ होईल. आर्थिक लाभाच्या उत्तम संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हे वर्ष खूप यश देणारे आहे.

कुंभ रास
शनिदेव तुमच्या राशीत विराजमान असून येथून मूळ त्रिकोणात आहे. वैदिक ज्योतिष शास्त्राच्या गणनेनुसार कुंभ राशीच्या लोकांना या राशीत शनी साडेसाती असली तरी अडीच वर्षांपर्यंत शनिदेवाची कृपा राहील.