सावदा : येथील स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी (55) यांचे आज सकाळी 7 वा. भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते एका कथेच्या कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना भुसावळ जवळ त्रास जाणवू लागल्याने त्यांना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
ते सावदा स्वामीनारायण मंदिराचे कोठारी व येथील स्वामीनारायण गुरुकुलचे मा. उपाध्यक्ष होते त्यांनी वेदांतव्याकरण या विषयावत संस्कृत या विषतात डबल पी एच डी केली होती ते भागवत कथाकार देखील होते त्यांनी सावदा सह परिसरात द्वारका हरिद्वार काशी आदी विविध ठिकाणी मोठ्या कथेचे आयोजन केले होते, त्याचे कथान हजारोच्या संख्येने भाविक उवस्थित राहत असत त्यांनी स्वामीनारायण संप्रदायाचे मोठे कार्य या भागात केले हिंदू धर्माचे प्रचार तसेच सर्व धर्माचे समरसते मध्ये त्यांचा मोठा पुढाकार होता, त्यांना संस्था व स्तरावरील मोठ्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते, त्यानी स्वामीनारायण संप्रदायाचे विविध गुजराती ग्रंथ मराठीत व हिंदीत अनुवादित केले होते, त्यांचेवर गुजरात येथील स्वामीनारायण संप्रदायाचे वडतालधाम येथे दि 29 रोजी संतपरंपरे प्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे या घटनेमुळे सावदा व परिसर तसेच विविध ठकाणी असेलेले त्यांचे भक्त शोकसागरात बुडाले आहे,