शेवयांची खीर; घरी नक्की ट्राय करा

तरुण भारत लाईव्ह२८ फेब्रुवारी २०२३। खीर या पदार्थांमध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकार दिसून येतात. तांदळाची खीर, गव्हाची खीर, आणि शेवयांची खीर. उडप्पी भागाताली सर्वात प्रसिद्ध असलेली शेवयांची खीर. शेवयांची खीर घरी बनवायला सुद्धा खूप सोप्पी आहे. शेवयांची खीर कशी बनवली जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
दूध, कन्डेंस्ड मिल्क,  हिरवी वेलची, राइस व्हर्मीसेली, साखर, बदाम, काजू, तूप

कृती
सर्वप्रथम पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घेऊन त्यात काप केलेले काजू व बदाम चांगले भाजून घ्या. नंतर त्याच पॅनमध्ये शेवया घालून एक ते दीड मिनिटे मंद आचेवर चांगल्या भाजून घ्या. पॅनमध्ये दूध उकळून घ्या. दूध उकळू लागताच त्यामध्ये भाजलेल्या शेवया घाला आणि चांगल्या शिजवून घ्या. दूध उकळून थोडं घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये साखर घाला व मिश्रण चांगलं एकजीव करा. यानंतर मिल्क पावडर, भाजलेले ड्राय फ्रुट्स आणि चिमुटभर वेलची पावडर घालून मिश्रण मंद आचेवर शिजवा. आणि सर्व्ह करा शेवयाची खीर