तरुण भारत लाईव्ह ।०५ फेब्रुवारी २०२३। मुंबईची प्रसिध्द बटाटा शेव पुरी सगळ्यांनाच खूप आवडते. सगळेच खुप आनंदाने खाणे पसंत करतात. हे घरी बनविणे सोपे आहे आणि संध्याकाळच्या स्नॅक साठी उत्तम आहे. शेव पुरी घरी कशी बनवली जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
गोल पुरी, उकडलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर पुदिना चटणी ,लाल मिरची आणि ,चिंच गुळाची चटणी , भाजकी चणाडाळ, डाळिंबाचे दाणे, चाट मसाला, कोथिंबीर, बारीक शेव
कृती
उकडलेले बटाटे घ्या त्यामध्ये सैधव मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या. प्लेट घ्या त्यावर पुरी ठेवा त्यावर तयार केलेले बटाटा मिश्रण ठेवा. मग त्यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो घाला. आता त्यावर कोथिंबीर पुदिना चटणी, लाल मिरची, चिंच गुळाची चटणी घाला. वरून बारीक शेव घाला.आता त्यावर चाट मसाला टाकून थोडी कोथिंबीर ,भाजकी तिखट चणाडाळ , डाळिंबाचे दाणे, लिंबू रस. बटाटा शेव पुरी सर्व्ह करा.