मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन सोडवायला हवा. शिंदे-फडणवीस सरकार कायदेशीर मार्गाने मराठा समाजाला न्याय मिळवून देतील, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने बोलावलेल्या बैठकीतून मराठा समाजाबाबत सरकारची आत्मियता दिसते, असे सांगून बावनकुळे म्हणाले, मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी राज्य शासन हे आरक्षण मिळवून देण्यासाठी ठाम असून अधिक मजबूत कायदेशीर लढा लढण्यात येईल. यासाठी क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने बैठक बोलाविली. मराठा आरक्षणाचा प्रश्न सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन सोडवायला हवा. शिंदे-फडणवीस सरकार योग्य पद्धतीने काम करून मराठा समाजाला न्याय मिळवून देतील. – चंद्रशेखर बावनकुळे (प्रदेशाध्यक्ष, भाजपा, महराष्ट्र)