शिंदे गट, ठाकरे गट पुन्हा एकत्र येण अशक्य, भुजबळांनी सांगितलं कारण

मुंबई : राज्यात फडतूस, काडतूस अशी वक्तव्य होत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येतील असं वाटत नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार यांच्या भूमिकेचं भूजबळ यांनी देखील समर्थन केलं आहे. आपण आपल्या देशातील उद्योगपतींचे खच्चीकरण करू नये. आपली बदनामी होता कामा नये असं छगन भूजबळ यांनी म्हटलं आहे.
यावेळी भुजबळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत म्हणाले की, “भक्तिभावाने मुख्यमंत्री शिंदे यांनी अयोध्याला जावे, राजकारण करु नये. जनसेवा हीच ईश्वर सेवा असून शिंदेंवर फार मोठी जबाबदारी पडली आहे. मात्र दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार अजून होत नसल्याने अनेक नेत्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.
भूजबळ म्हणाले, “आपण आपल्या देशातील उद्योगपतींचे खच्चीकरण करू नये. आपली बदनामी होता कामा नये. टाटा बिर्ला यांनी देखील खूप चांगलं काम केलं आहे. पवारांचं म्हणण आहे की, उद्योगपतींच्या बाबतीत कुठपर्यंत ताणून धरायचं. इतरही अनेक मुद्दे आहेत त्यावर चर्चा झाली पाहिजे.” अशा प्रकारे भूजबळांनी समर्थन केलं आहे.