Sanjay Patil : शिंदेसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख बेपत्ता, पोलिसात नोंद

---Advertisement---

 

Sanjay Patil : शिवसेना शिंदे गटाचे जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख असलेले संजय लोटन पाटील (वय ५८, रा. दोनगाव, ता. धरणगाव) हे बेपत्ता झाल्याची नोंद जळगाव शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

संजय पाटील हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते धुळे येथे वास्तव्यास होते. १ सप्टेंबर रोजी ते गावाकडे जात असल्याचे सांगून घरातून निघाले. पारोळा चौफुली, धुळे येथे त्यांचे नातेवाईक धनराज पाटील यांनी त्यांना त्यांच्या वाहनाने अमळनेर बसस्थानकावर सोडले.

सकाळी ११ वाजता ते अमळनेरहून जळगावकडे रवाना झाले. संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांनी ते जळगावातील गोलाणी मार्केट रोडवर शेवटचे दिसले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संजय पाटील यांनी शहरातील एका बँकेतून काही पैसे काढले, त्यानंतर कोर्ट चौकाकडे जाताना दिसले.

दरम्यान, त्यांचे दोन्ही मोबाइल बंद आहेत, त्यामुळे त्यांच्या बेपत्ता झाल्याची खात्री झाली आहे. यानंतर, नातेवाइकांनी तातडीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---