---Advertisement---

Shindkheda News : प्रथमच यशस्वी प्लेसेंटा अब्रप्शन सिजेरियन डिलिव्हरी

---Advertisement---

शिंदखेडा : शहरात प्रथमच प्लेसेंटा अब्रप्शन सिजेरियन डिलिव्हरी (Placental Abruption) यशस्वी करण्यात आली आहे. डॉ. मोनिका पिंजारी व जिजाऊ हॉस्पिटल टीमने दाखवलेल्या धाडसामुळे आज एका बाळाचे व आईचे प्राण वाचले असून, या धाडसाचे व वैद्यकीय कौशल्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

शिंदखेडा शहरातील रज्जाक नगरातील रहिवासी नजमा रियाज मदारी (वय 22) यांना 18 मार्च 2025 रोजी अचानक योनीमार्गातून अतिरक्तस्राव सुरु झाला. त्यांना तात्काळ जिजाऊ हॉस्पिटल व प्रसुतीगृह येथे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

डॉ. मोनिका पिंजारी यांनी तपासले असता त्या आठ महिन्यांच्या गर्भवती व त्यांचा वार (प्लेसेंटा) अचानक सुटल्यामुळे अतिरक्तस्राव होत असल्याचे समोर आले. तसेच बाळाचे हृदयाचे ठोकेही तीव्र प्रमाणात कमी होत होते. त्यामुळे त्यांची लवकरात लवकर सिझेरियन डिलिव्हरी करणे गरजेचे होते. कारण तसे न केल्यास आई आणि बाळ दोघांच्या जीवितास मोठ्या प्रमाणात धोका होता. डॉ. मोनिका पिंजारी यांनी वेळेचे प्रसंगावधान राखत शर्तीचे प्रयत्न करत शस्त्रक्रिया यशस्वी केली व आई व बाळ दोघांचे प्राण वाचवले.

शिंदखेडा शहरात अशा सुविधांची व तज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे सहसा असे ऑपरेशन्स धुळे, जळगाव, नाशिक व पुणे येथे केले जातात व या सगळ्या प्रवासामध्ये मौल्यवान असा वेळ वाया जातो आणि बऱ्याच वेळेस रुग्णांना रस्त्यातच आपला जीव गमवावा लागतो. डॉ. मोनिका पिंजारी व जिजाऊ हॉस्पिटल टीमने दाखवलेल्या धाडसामुळे आज एका बाळाचे व आईचे प्राण वाचले असून, संपूर्ण शिंदखेडा शहरात त्यांचे सर्व कौतुक होत आहे.

दरम्यान, अशा शस्त्रक्रिया सहसा मोठ्या हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. प्रसूतीशास्त्रात ही सगळ्यात अवघड अशी शस्त्रक्रिया मानली जाते यामध्ये अतिरक्तस्राव होऊन आई आणि बाळ दोघांच्या जीवितास धोका असतो.

प्लेसेंटा अब्रप्शन म्हणजे काय?

प्लेसेंटा अब्रप्शन (Placental Abruption) म्हणजे बाळाला पोषण आणि ऑक्सिजन पुरवणारा अवयव (प्लेसेंटा) गर्भाशयाच्या भिंतीला (Uterus) चिकटून न राहता वेगळा होणे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment