---Advertisement---

शिंदखेडा तालुक्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका, शेतकरी हवालदिल

---Advertisement---

शिंदखेडा : तालुक्यातील मेथी परिसरातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला आहे. मागील खरिपात चांगला पाऊस झाल्यामुळे विहिरींना मुबलक पाणी होते. त्यामुळे सर्वच परिसरात रब्बीचे पीक जोरात घेतले गेले. रब्बीत लागवड केलेला गहू, हरभरा निघाला, पण काही रब्बीचे पिके काढणीस झालेले असताना अवकाळीने परिसराला झोडपून काढले. त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडातला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाला.

मेथी परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा, भुईमूग, मका, भाजीपाला पिके यांची लागवड करण्यात आलेली आहे त्यांच्या ऐन काढणीच्या वेळेस अवकाळी ने परिसरात थैमान घातल्याने शेतकरी राजाच्या डोळ्यांमध्ये अश्रूंचे धारा लागत आहेत पहिलेच मोठ्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला रब्बीपासून मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा होती तसे उत्पन्नही शेतकऱ्याला मिळणार होते पण अवकाळी ने त्याच्या स्वप्नावर पाणी फिरवले. अन शेतकरी हवालदिल झाला.

भुईमुगाच्या शेंगा काढून शेतात पडलेल्या आहेत त्यांचा काढणीचा खर्चही अवकाळी निघू देणार नाही अशी शक्यता बळावत आहे, भुईमुगाला नसलेला बाजार भाव त्यात अवकाळीचे थैमान, भुईमुगांचा पालाचा होणारा नाश शेतकऱ्याला पशुधन वाचवावे तरी कसे चाराच वाया गेला शेतकरी आपल्या पशूंकडे कडे बघून चिंताग्रस्त होतो.

प्रत्येक हंगामात येणारा अवकाळी यामुळे शेतकरी वर्गाचे होणार तरी कसे,कुटुंब चालवावे तरी कसे, आपला हा व्यवसाय कधी नफ्यातील व कुटुंबाची योग्य पालन पोषण कसे करू या विवांचनेत शेतकरी दिसतो.रब्बी हंगामातील पिके काढण्याची अजून बाकी असताना यावर्षीच्या खरीपासाठी जमीन तयार करण्यासाठी अवकाळी मुळे फार मोठा उशीर होत आहे मजुरांचे संकट, वाढीव मजुरी दर, ट्रॅक्टर द्वारे नागरणी व इतर कामे या सर्वांचा खर्च करावा तरी कसा रब्बी हंगामातील उत्पन्नाने दिलेला मोठा फटका पुढील हंगामातील शेत जमिनी तयार करण्यावर होणार आहे. बरीचशी जमीन अजून तयार करण्याची बाकी आहे त्यामुळे यावर्षीचा खरीप हंगाम कसा निघेल असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

परिसरात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो त्यासाठीचा चारा साठवणूक करण्यापूर्वीच अवकाळी ने त्याला ओला केला . चारा हा शेतातच पडून आहे त्याला भरण्यासाठी वेळही अवकाळी मिळू देत नाही त्यामुळे ओला चारा पशूला खाण्यास त्रास होतो आजारी पडतात त्यामुळे चारा संकट समोर दिसत असल्यामुळे पशुपालक अडचणी सापडणार आहे.

शेळ्या व मेंढ्यांसाठी भुईमुगाचा पाला घेताना पशुपालक दिसून येतात पण अवकाळी ने भुईमुगाचा पाला पूर्ण काळपट केला. काळपट चारा तो मेंढ्यांना व शेळ्यांना खाऊ घालावा तरी कसा चारा टंचाईला सामोरे जावे तरी कसे असा यक्षप्रश्न शेळी मेंढी पालकांसमोर उभा राहतो. दिवसभर असलेले ढगाळ वातावरण शेतीतले काम करण्यासाठी अडचणीचे ठरत आहे कधी धो धो बरसेल सोसाट्याचा वारा सुटेल, विजा चमकतील कसे नुकसान होईल याचा अंदाज शेतकऱ्याला येत नसल्याने जीव मुठीत धरून शेतकरी शेतात काम करताना दिसून येतो.

डोळ्यादेखत वाया जाणार पीक शेतकऱ्याला राबराब राबून हाती शिल्लक काहीच राहत नसल्याने पुढील हंगामातील शेती करावी का नाही, कोणते पीक घ्यावे बियाण्यांचे वाढीवभाव, खतांवर होणारा मोठा खर्च, लागवडीसाठी लागणारा मोठा पैसा याची जमवाजमव करावी तरी कशी या सर्व प्रश्नांच्या गर्देत शेतकरी आपले डोके गुडघ्यात घालून बसतो. शेतकऱ्यांच्या हाती सध्या तरी काहीच नसल्याने शासन प्रशासनचीही उदासीनता शेतकऱ्यांच्या जीवावर उडणारीच आहे
कांदा व भुईमुगाच्या पिकाला सानुग्रह अनुदान, पिक विमा तात्काळ मंजूर करून द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होते. अवकाळी जरी होत आहे तरी भाजीपाला पिके काढली जात आहेत त्यांना पण योग्य असा भाव मिळत नाही.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment