---Advertisement---

Shindkheda Bus Accident : शिरपूर-शिंदखेडा बसला ट्रकची धडक, 25 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी, एक जागीच ठार

---Advertisement---

---Advertisement---

Shindkheda Bus Accident : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील दाभाशीजवळ आज सकाळी शिंदखेडाकडे जाणाऱ्या बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात 25 पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूरहून शिंदखेड्याकडे निघालेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (क्रं. MH-14 BT-2112) बस दभाशीजवळ वळण घेत असताना, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या (क्रं RJ 11 GC 3487) ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की बस मध्यभागी अक्षरशः पूर्णपणे तुटली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस व आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्य सुरू केले.

या भीषण अपघातात 25 ते 30 प्रवासी जखमी झाले असून, अंदाजे एक चार ते पाच वर्षांची चिमुरडी जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात सामाजिक कार्यकर्त्यांनी, तसेच शहर पोलीस व एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अपघातानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको केला आहे.

एका प्रवाशाचा जागीच मृत्यू

शिंदखेडा तालुक्यातील दाभाशीजवळ शिंदखेडाकडे जाणाऱ्या बसने वळण घेतले असता, समोरून येणाऱ्या ट्रकने बसच्या मधोमध जबर धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात या अपघातात 25 पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---