मोठी बातमी : विधानसभेपाठोपाठ संसदेतील शिवसेना गटाचे कार्यालय शिंदे गटाकडे

तरुण भारत लाईव्ह अपडेट : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आजपासून तीन दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. काही वेळापूर्वीच या सुनावणीला सुरुवात झाली आहे.

सुरुवातीच्या टप्प्यातच ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सदस्यांच्या अपात्रतेबाबत आधी निर्णय घेण्याची मागणी लावून धरली आहे.  तसेच राज्यपालांच्या अधिकारांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

तसेच प्रतोद पद, गटनेतेपद, पहाटेचा शपथविधी याबाबत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, विधानसभेपाठोपाठ संसदेतील शिवसेना गटाचे कार्यालय शिंदे गटाला देण्यात आल्याची माहिती सूत्रानुसार कळते आहे.