शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी : आज दिवसभरातील सुनावणीत काय घडले? वाचा जसेच्या तसे..

शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी आज दुसऱ्या दिवशीही विधिमंडळात सुरू आहे. ठाकरे गटाचे वकील अॅड. देवदत्त कामत हे यांच्याकडून शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची उलटतपासणी सुरू आहे. गुरुवारीदेखील दिलीप लांडे यांची उलटतपासणी झाली होती. आजही त्यांची उलटतपासणी सुरू झाली. दिलीप लांडेंच्या उलट तपासणी दरम्यान ठाकरे गटाच्या वकीलांनी एक अटेंडंटशिट सादर केली. ही अटेंडट शीट 21 जून 2022 रोजी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीची होती. या अटेंडंटशिटवर, शिंदे गटातील तब्बल 23 आमदारांच्या सह्या आहेत. महत्त्वची बाब म्हणजे, या बैठकीत एकनाथ शिंदे यांना गटनेता पदावरून हटवण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला होता, ज्याला या आमदारांनी अनुमोदन दिलं होतं.  तर, सुनावणीत आमदार दिलीप लांडे यांनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदावरून हटवण्याच्या ठरावावर आपली स्वाक्षरी नसल्याचा दावा आमदार लांडे यांनी केला.

आजच्या सुनावणीत आमदार दिलीप लांडे यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न ठाकरे गटाचे वकील अॅड. देवदत्त कामत यांनी केला.

आज दिवसभरातील सुनावणीत काय घडले? वाचा जसेच्या तसे..

आमदार दिलीप लांडे 20 मिनिट उशिरा आले. ठाकरे गट वकील अॅड. देवदत्त कामतांच्या विनंती नंतर साक्षीदाराने केलेला हा उशीर विधानसभा अध्यक्षांनी रेकॉर्ड वर आणला

दिलीप लांडे : राहुल नार्वेकर हे शिवसेना पक्षाचे विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार होते

कामत :  2 जुलै 2022 ला शिवसेना आमदार होते का?

दिलीप लांडे : मी नवीन असल्याने सर्व सदस्यांना ओळखत नाही

कामत : राजन साळवी हे विधानसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवार होते म्हणून तुम्ही हे उत्तर देत नाहीये ?

लांडे : मी नवीन असल्यामुळे मी सर्व सदस्यांना ओळखत नाही

कामत : याचा अर्थ तुम्ही नवीन असल्याने शिवसेना पक्षाच्या सर्वच सदस्यांची नावे माहीत नव्हती ? ही म्हणणं बरोबर ठरेल का ?

लांडे : बरोबर

कामत : म्हणजे 3 जुलै 2022 रोजी तुम्ही भाजप च्या राहूल नार्वेकर यांना अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मतदान केले होते का ?

(या प्रश्नावर शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला…मतदान करणे हा विशेषधिकार आहे)

कामत : आपत्रता याचिका क्रमांक 19 मध्ये उत्तर देताना तुम्ही म्हणाला आहेत की तुम्ही तुम्ही राहुल नार्वेकर यांना 164 मतांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडून आणला..याचा अर्थ तुमच्या गटाकडून जो व्हीप जारी केला त्यानुसार तुम्ही राहुल नार्वेकर यांना मतदान केलं ?

कामत : राहुल नार्वेकर यांना मतदान करावे असा लिखित स्वरूपात व्हीप आहे का ?

लांडे : आठवत नाही

कामत : राहुल नार्वेकर यांना मतदान करावे आणि राजन साळवी विरोधात मतदान करावे असा कुठलाही व्हीप शिवसेना पक्षाने काढला नव्हता ? हे बरोबर आहे का ?

लांडे : मी आधीच सांगितले, आठवत नाही

कामत : rajgadbank9@mail.com  हा इमेल अड्रेस आपण ओळखता का ?

लांडे : हो…माझा आहे परंतु माझ्या मतपेढीचा आहे

कामत : याच इमेल आयडी वर 2 जुलै दुपारी 2 वाजून 42 मिनिटांनी सुनील प्रभू यांनी पाठवलेले 2 पक्षादेश मिळाले आहे का ?

लांडे : मी मुंबईत नव्हतो, मला माहित नाही. माझ्या भावाने दिलेल्या माहितीप्रमाणे विजय जोशी यांच्या नावाने मेल पाठवला होता


देवदत्त कामत :  आपण 3 जुलै 2022 रोजी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी पाठवलेल्या व्हीपचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आपण अपात्रता कारवाईसाठी पात्र आहात. हे चूक की बरोबर?

दिलीप लांडे : मला सुनिल प्रभू यांनी कुठलाही व्हीप पाठवला नाही.

कामत : 4 जुलै 2022 रोजीचा भरत गोगावले यांनी जारी केलेला कथित पक्षादेश कसा मिळाला ?

लांडे : माझ्या हातात दिला

कामत : कथित पक्षादेश आपल्या हातात केंव्हा ठेवण्यात आला ?

लांडे : मला वेळ आठवत नाही. मला तारीख आठवते 4 जुलै

कामत : कथित व्हीप तुम्हाला तुमच्या हातात दिल्यानंतर तुम्ही त्याची पोचपावती दिली का ?

लांडे : आठवत नाही

कामत : 4 जुलै 2022 विश्वास दर्शक प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वी भरत गोगावले यांनी कुठलाही व्हीप जारी कुठल्याही सदस्याला दिला नव्हता हे खरं आहे का ?

लांडे :  मला दिला आहे हे मी कबूल केलं आहे

कामत : 4 जुलै 2022 रोजीच्या विश्वास दर्शक ठरावात आपण एकनाथ शिंदे यांना मतदान केले जे भाजप पक्षाच्या पाठींबाने सरकार बनवत होते ? हे बरोबर आहे का ?

लांडे : हे बरोबर आहे

कामत : 2 जुलै 2022 रोजी सुनील प्रभू यांनी पक्षाकडून जो पक्षादेश दिला होता त्याचे तुम्ही उल्लंघन करून तुम्ही अपात्रता ओढवून घेतली आहे ?

लांडे : मला सुनील प्रभू यांनी कुठलाही व्हीप पाठवला नाही मिळालं नाही

कामत : 20 जून आणि 21 जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होतात का ?

लांडे : मी गेली 25 वर्षे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे

कामत : म्हणजे तुम्ही 20 आणि 21 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होतात ?

लांडे :  मी 20 जून या तारखेला त्यांना भेटलो होतो. मी 20 तारखेला मतदान होत म्हणून तिथे त्यांना भेटलो 21 जूनला भेटलो नाही

कामत : 20 जून 2022 नंतर तुम्ही 24 जून 2022 पर्यत एकनाथ शिंदे यांच्या सोबत तुमचा कुठलाही संपर्क नव्हता ? हे बरोबर आहे का ?

लांडे : बरोबर आहे

कामत : 20 ते 30 जून 2022 दरम्यान तुम्ही मुंबईत होतात का ?

लांडे : आठवत नाही. 20, 21 आणि 22 तारखेला मुंबईत होतो

कामत : 22 जून ते 30 जून 2022 दरम्यान तुम्ही महाराष्ट्र बाहेर प्रवास केला आहे का ?

लांडे : हो

कामत : 22 जून ते 20 जून 2022 दरम्यान तुम्ही महाराष्ट्र बाहेर कुठे गेला होता ? हे सांगू शकाल का ?

लांडे : ही माझी खाजगी माहिती आहे, ती मी सांगू शकत नाही…मी कुठेही फिरू शकतो

कामत – 22 जून ते 30 जून 2022 दरम्यान तुम्ही सुरत आणि गुवाहाटीला गेला होतात का ?

लांडे : मी आधीच सांगितलं की ही माझी खाजगी माहिती आहे. मी कुठे फिरायचं हा माझा अधिकार आहे

कामत : 21 जून आणि 22 जून 2022 रोजी तुम्ही वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्याना मुलाखती दिल्या का ? ज्यामध्ये तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत आणि एकनाथ शिंदे यांना आपण पाठींबा देत नाहीत असं मुलाखतीत बोलले होते का?

लांडे : आठवत नाही

कामत : सुरत आणि गुवाहाटी मध्ये किंवा महाराष्ट्र बाहेर ज्या हॉटेल मध्ये तुम्ही राहत होतात याचे भाडे भाजप पक्षाने दिले का? हे खरे आहे का ?

लांडे : मी स्वतः गेलो होतो, मी कुठे राहिलो कुठे गेलो याची माहिती मी कोणाला देऊ शकत नाही

कामत : 22 ते 30 जून दरम्यान महाराष्ट्र बाहेरील प्रवास खाजगी चार्डड प्लेन ने गेला होता का ?

लांडे : ही माझी खाजगी जीवनाची माहिती आहे. मी रिक्षा चालवत गेलो का किंवा मी बैलगाडीत गेलो हे मी सांगू शकत नाही

कामत : 21 जून 2022 रोजी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत जी सही तुम्हला दाखवतो ती तुम्हीच केली आहे का ?

लांडे : बरोबर आहे. तुम्ही जे कागदपत्र दाखवताय. या कागदपत्रावर हाताने वरच्या बाजूस काहीतरी लिहिले आहे…माझी सही झाल्यानंतर पक्षादेश क्रमांक 2/2022 असे लिहिलेले आहे असे मला वाटत

कामत : 21 जून 2022 ला व्हीप जारी झाला जो सुनील प्रभू यांच्या कडून मिळाला होता.. म्हणून तुम्ही त्या बैठकीला उपस्थित होता ? हे खरे आहे का ?

लांडे : मला गुलाबराव पाटील नावाच्या व्यक्तीने फोन केला होता म्हणून मी त्या बैठकीला उपस्थित होतो

कामत : 21 जून 2022 रोजी वर्षा निवासस्थानी जी बैठक बोलावली त्या बाबत जो व्हीप मिळाला याची पोचपावती दिली होती का ?

लांडे : मी आधीच सांगितले की 21 तारखेच्या बैठकीसाठी गुलाबराव पाटील यांचा फोन आला होता

( शिवसेना विधिमंडळ कार्यालयाच्या लेटरहेडवरील 21 जून 2022 च्या कागदपत्रावर साक्षीदाराला या संदर्भातील साक्षीदाराची सही दाखवली गेली)

कामत – या कागदपत्रवर जी सही केली गेली आहे ते तुमचीच आहे का ?

लांडे – हो

कामत – 21 जून 2022 च्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सर्व उपस्थित आमदारांच्या पाठींब्याने बैठकीत एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदावरून हटवले हे खरे आहे का ?

लांडे – आठवत नाही

कामत – याच बैठकीत उपस्थित आमदारांच्या पाठींब्याने अजय चौधरी यांनी उद्धव ठाकरे यांनी नेमणूक केली…हे बरोबर आहे का ?

लांडे- आठवत नाही

कामत – 21 जून 2022 रोजी वर्षावर सुरू असलेल्या बैठकीत उपस्थित आमदारांना मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले होते याची कल्पना दिली नव्हती ?

लांडे- दिली होती

कामत – 20 जून ते 30 जून 2022 दरम्यान एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवली होती का ? ज्यामध्ये भाजपला साथ द्यायचे ठरले ?

लांडे – हो बैठक झाली

कामत – राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक कुठे आणि केंव्हा झाली

लांडे – आठवत नाही

कामत – राष्ट्रीय कार्यकारणीच्या सदस्यांना या बैठकीबाबत नोटीस पाठवली होती का ?

लांडे – माहीत नाही

कामत – 20 जून ते 30 जून 2022 दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून कुठलीही राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली नव्हती ? हे चूक की बरोबर

लांडे – लक्षात येत नाही

कामत – याच दरम्यान प्रतिनिधी सभा किंवा या बाबत बैठक एकनाथ शिंदे यांनी बोलवली होती का ?

लांडे- आठवणीत येत नाही

कामत – तुम्ही 22 जून 2022 रोजी वर्षा बंगल्यावर शिवसेना विधीमंडळ पक्षाची एखादी बैठकीला उपस्थित होते का ?

लांडे- हो

कामत – या बैठकीचे अध्यक्ष अजय चौधरी होते का ?

लांडे- असे नव्हते, पक्षाच्या नेते मंडळींची बैठक होती

 22 जून 2022 रोजी उपस्थित आमदारांची अटेंडन्स शीट साक्षीदाराला दाखविण्यात आली

कामत – 22 जून 2022 रोजी वर्षावर झालेल्या बैठकीत जी अटेंडन्स शीट दाखवली जात आहे त्यावर आपण सही केली का ?

लांडे – हो परंतु, विधिमंडळ सदस्यांच्या सह्या यादीवर घेतलेल्या असतात. आमची यादी बनवली व सह्या घेतल्या बैठकीच्या उपस्थिती नंतर पेनाने लिहिलिले आहे…मला यातून निदर्शनास आणून द्यायचे आहे की विधानसभा सदस्यांच्या सह्या यादीवर आधी घेण्यात आल्या.

कामत – उदय सामंत आणि वैभव नाईक यांनी नंतर येऊन या बैठक उपस्थित पत्रावर 22 जून 2022 रोजी सही केली होती हे खरं की खोटं ?

लांडे- मला माहित नाही

पहिल्या सेशन मधील सुनावणी पूर्ण 12 नंतर प्रश्न उत्तरेच्या तासानंतर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष यांनी सुनावणी साठी बोलवल आहे


देवदत्त कामत- सध्याच्या महायुतीत नवाब मलिक यांना सामावून घेण्याबाबत आक्षेप नोंदवला होता का?

दिलीप लांडे- ते सरकारमध्ये नाहीत

सुनावणीला पुन्हा सुरूवात

देवदत्त कामत :  आपला पक्ष आणि शिवसेनेतील पदाधिकारी यांच्यात मोठी नाराजी आहे. पोलिसांच पोस्टिंग प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये होते. त्याच प्रमाणे तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांचे दाऊद सोबत संबंध होते.या दोन कारणामुळे पक्षात नाराजी होती याबद्दल आपली काय माहिती ?

दिलिप लांडे : मी याबद्दल माझं मत माझ्या रिप्लाय मध्ये दर्शवल आहे.व त्या मताशी अद्यापही बांधील आहे.

देवदत्त कामत : 21 जून 2022 जूनच्या पत्रात उपाध्यक्ष यांचा निर्णय होता त्यात असे दर्शवत की उपाध्यक्ष यांनी तो ठराव मान्य केला होता

लांडे :  अशा पत्राबद्दल मला काही माहीती नाही

देवदत्त कामत : आपण शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला आपण उपस्थित होता कारण सुनील प्रभू यांनी जे पत्र आपल्याला दिले होते ते आपल्याला प्राप्त झाल होते

लांडे – मला संतोष बांगर नावाच्या व्यक्तीने फोन केला होता आणि मला बोलावले होते

कामत : एकनाथ शिंदे हे खरे नेते आहेत असे म्हणता त्याच वेळी ते विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत असे म्हणता आहात का?

लांडे – राजकीय पक्षाचे आणि विधिमंडळ पक्षाचे

देवदत्त कामत –  शिवसेना विधिमंडळ पक्षाचे सदस्य जे बैठकीला उपस्थित नव्हते त्यांना अपात्र करावे असे आधीच ठरलं होतं का?

लांडे – आता मला आठवत नाही

कामत – ठरावाखाली अनुमोदक म्हणून आपली सही आहे. हे खरे की खोटे?

लांडे – माझी डुप्लिकेट सही केलेली आहे. ही माझी ओरिजनल सही नाही. माझा बोगस सही केली गेली आहे.

कामत – सुनिल प्रभू यांनी 22 जून 2022 रोजी पाठवलेल्या नोटीस मध्ये स्पष्ट पण् म्हटले होते, जे आमदार २२ जूनच्या बैठकीत उपस्थित राहणार नाहीत, त्यांना अपात्र केले जाईल.

लांडे – मला आठवत नाही.

कामत – सुनिल प्रभू यांनी सांगितले होतें की काही आमदारांनी आधीच ठरवले होते की जे आमदार 22 जून 2022 रोजीच्या बैठकीत अनुपस्थितीत राहतील त्यांना अपात्र ठरवले जाईल. 22 जून 2022 च्या बैठकीत हा प्रस्ताव होता तेव्हा तुम्ही त्यास विरोध केला नाही. हे चूक की बरोबर?

लांडे -प्रतिज्ञापत्रात सादर केल्याप्रमाणे.

कामत – एकनाथ शिंदे यांना फायदा व्हावा म्हणून तुम्ही ठरावावर खोटी  सही केली.

लांडे – हे चूक आहे

कामत – 22 जून 2022 रोजीचा ठराव, 21 जून 2021 रोजीच्या हजेरी पत्रकावरील 25 नोव्हेंबरचे कागदपत्रे यांवरील सह्या या एकाच व्यक्तीच्या आहेत, हे सिद्ध होऊ नये म्हणून हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल तुम्ही जोडलेला नाही.

लांडे – मी सहीच केली नाही तर पुरावा घ्यायची गरज नाही.

कामत – पान क्रमांक 229 वर आपलीच सही आहे का!

लांडे – होय

कामत – आपण या कागदपत्रावर स्वाक्षरी कुठे केली?

लांडे – आठवत नाही

कामत – या पानावर आपले नाव व मतदारसंघ हा हाताने लिहिलेले आहे. बाकीच्यांचे टाईप केलेले आहे. असे का?

लांडे – मी माझ्या हस्ताक्षरात लिहिले आहे.

कामत – आपले नाव व स्वाक्षरी नंतर समाविष्ट केलेले आहे. आपण 20 व 21जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेला नव्हता. नंतर तुम्ही त्यांच्या सोबत गेला होता. नंतर तुम्ही सही केली. हे चुकीचे आहे की बरोबर?

लांडे – मी केलेली षही माझ्या हस्ताक्षरात आहे. आणि मी केलेली आहे.

कामत – एकनाथ शिंदे यांना भाजप सोबत सरकार स्थापन करण्यासाठी आपण पाठिंबा देऊन पक्ष विरोधी कारवाई केली आहे. हे बरोबर आहे का?

लांडे – शिवसेना पक्षाबरोबर भाजपने युती केलेली आहे.

कामत – शिवसेना पक्ष नव्हे तर फक्त एकनाथ शिंदे नेतृत्व करत असलेल्या आमदारांच्या एका गटाने भाजप सोबत सरकार स्थापन केले. हे बरोबर आहे का?

लांडे – शिवसेना व भाजपची युती आहे व त्यांचे सरकार आहे.

116 प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर दिलीप लांडे यांची उलट साक्ष संपली. आता आमदार योगेश कदम यांची उलट साक्ष घेतली जाईल. वकील देवदत्त कामत हे आता योगेश कदम यांची उलट साक्ष घेणार आहेत.