खान्देशमध्ये या ‘विकासो’वर फडकला शिवसेनेचा भगवा

पारोळा : तालुक्यातील करमाड खुर्द येथील वि.का.सोसायटीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढविण्यात आली.

यामध्ये भूषण धर्मराज पाटील, विष्णु भगवान पाटील, सुरेश साहेबराव पाटील, कलाबई संभाजी पाटील, रामराव दगा पाटील, राजू हरिराम पाटील, विक्रम शेनपडू गढरी यांची
बिनविरोध निवड करण्यात आली असून करमाड विविध कार्यकारी सोसायटीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

या निवडीबद्दल आमदार चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे व्हॉइस चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अमोल पाटील यांनी अभिनंदन केले.