Viral video : ‘डोळ्यात अश्रू अन्…’, शिवगर्जना ऐकून अंगावर येईल काटा, तरुणीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडत आहे.

या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्यांचे बलिदान, आणि त्यांच्या अभिमानाची गाथा मोठ्या पडद्यावर पाहताना प्रेक्षकांमध्ये अत्यंत भावुकता दिसून येत आहे. अशाच एका भावुक झालेल्या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चित्रपटाचा समारोप होण्यावर एक तरुणी मोठ्या आवाजात शिवगर्जना करीत स्क्रीन समोर उभी राहिली. तिचे शब्द होते, “आस्ते कदम, आस्ते कदम, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रियकुलावंस, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज महाराज श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!” यावेळी तिला दम लागले तरीही ती एकदाही थांबली नाही.

तिच्या गर्जनात एकत्र येऊन, चित्रपटगृहातील इतर सर्व प्रेक्षकांनी उठून छातीवर हात ठेवून शिवाजी महाराजांचे जयजयकार सुरू केले. संपूर्ण चित्रपटगृहामध्ये फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांचे नाव गूंजत होते.

हे दृश्य पाहून सभागृहात अनेक प्रेक्षकांची डोळ्यात अश्रू भरले. हे दृश्य भावनांनी भरलेल्या प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्याला लाखो लोकांचा प्रतिसाद मिळत आहे.

हा दृश्य पाहून अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान भिनून जातो. चित्रपटगृहात घडलेल्या या भावनात्मक दृश्याने संपूर्ण प्रदेशात छावा चित्रपटाची गाजदेखील आणली आहे. प्रेक्षकांच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान आजही अभिमानाने भरले आहे, हे या व्हिडीओने ठरवून दिले आहे.