तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव, १९ एप्रिल : शिवाजी नगरातील रहिवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लोकप्रतिनिधींच्या आपसातील राजकारणामुळे हा परिसर मूलभूत सुविधांपासून वंचित राहिला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी ‘तरुण भारत’शी बोलताना केला.
शिवाजी नगर प्रभाग क्रमांक दोनमधील गटारींची समस्या गंभीर बनली आहे. गटारींची साफसफाई करण्यासाठी कर्मचारी येत नसल्याने समस्येत वाढ झाली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु महापालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने पाहत नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. लोकप्रतिनिधींच्या राजकारणात हा परिसर विकासापासून दूर गेला आहे. मूलभूत सुविधादेखील देण्यात न आल्यावर नारिकांमध्ये रोष दिसत आहे. नागरिकांना होणारा त्रास केव्हा कमी होईल, अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
नागरिकांच्या प्रतिक्रिया
– शारदा लेकुरवाळे, नागरिक
मागील २५ वर्षांपासून आम्ही येथे राहतो. आमच्या परिसरात गटार स्वच्छ करण्यात येत नाही. घंटागाडी वेळेवर येते. मात्र, गटारी नियमित स्वच्छ करण्यात येत नाहीत. याबाबत वारंवार तक्रार करूनदेखील सफाई कर्मचारी गटारी स्वच्छ करण्यासाठी मनपा कर्मचारी येत नाहीत. आम्ही स्वत: गटारी स्वच्छ करतो.
-विजय राठोड, नागरिक
शिवाजी नगरमधील नारिकांना वॉटर, गटार आणि वीज मीटर या समस्यांना कायम समोरे जावे लागत आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून या सोयीसुविधा दिल्या पाहिजेत. महापालिकेच्या अधिकार्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी करून सुखसुविधा दिल्या पाहिजेत. काही नगरसेवक काम करत आहेत तर काही केवळ श्रेय घेण्यात आघाडीवर आहेत. राजकारणामुळे शिवाजी नगरवासीयांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.
-प्रजुबाई सोनार, नागरिक
शिवाजी नगर परिसरात गटारींची समस्या बिकट बनली आहे. या परिसरात पथदिवे नाही. दुसर्या गल्लीत नळाला पाणी येते. मात्र आमच्याकडे येत नाही.
-वसंत पाटील, नागरिक
आमच्या परिसरात नेहमीच कचरा पडून असतो. यामुळे डासांचा त्रास होत आहे. सफाई कर्मचारी येत नसल्याने आबालवृध्दांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
-सुरेश पवार, नागरिक
या समस्येकडे महापालिकेने लक्ष द्यावेआमच्या परिसरास रस्ते, पथदिवे, गटारी या समस्यांनी घेरले आहे. रस्ते खराब झाले आहेत त्यावर चालणेदेखील अवघड होऊन बसले आहे. लवकरात लवकर रस्ते दुरुस्त करावेत. तसेच गटारींची स्वच्छता नियमित करण्यात यावी.
-कल्पना
शिवाजी नगरमध्ये मागील ३५ वर्षांपासून आमचा रहिवास आहे. मनपाच्यावतीने आम्हाला अद्यापही सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
– योगिता शुक्ल, नागरिक
शिवाजी नगरचा विकास स्थानिक राजकारणात अडकला आहे. महापालिकेचा निधी हा नगरसेवकांकडे येत असतो. याबाबत विचारणा केली असता त्यात राजकारण केले जाते. याचा फटका मला बसला आहे.