धक्कादायक! अवघ्या ५ वर्षीय चिमुकल्याचा बोरवेल मध्ये पडून मृत्यू

तरुण भारत लाईव्ह ।१४ मार्च २०२३। अहमदनगर मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. १५ फूट खोल बोरवेल मध्ये पडून अवघ्या ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सागर बुधा बरेला असं या मयत चिमुकल्याचं नाव आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे शेतातील बोरवेलमध्ये ऊसतोड कामगाराचा पाच वर्षांचा मुलगा हा बोअरवेलमध्ये तब्बल ११ फूट खाली हा चिमुरडा अडकला होता. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामन दलाचे जवान दाखल झाले मात्र त्यांच्या शर्तीच्या प्रयत्नाना अपयश आले. तब्ब्ल आठ तास हा चिमुकला बोरवेल मध्ये अडकला होता. या मुलाला वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू होतं. एनडीआरएफच्या पाच पथकाकडून मुलाला बाहेर काढण्यात आले त्यावेळी तो मृत असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.