दुर्दैवी ! शेत मालाचे नुकसान पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू

---Advertisement---

 

पाचोरा : तालुक्यात एक दुःखद घटना समोर आली आहे. वारखेडी येथील एका तरुणाचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. हा तरुण अल्पभूधारक शेतकरी व टपाल विभागात नोकरी करीत होता. तरुणाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वरखेडी येथील ३५ वर्षीय सतिश मोहन चौधरी हे अल्पभूधारक शेतकरी व पोस्टात खात्यात नोकरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. रविवारी २१ व २२ सप्टेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे आपल्या शेतातील शेत मालाचे नुकसान किती झाले हे पाहण्यासाठी ते सकाळीच शेताकडे गेले. ते शेतात असतानाच जोरदार पाऊस सुरु झाला. जोरदार पावसामुळे ते एका झाडाखाली थांबले. पावसाचा जोर कमी झाला असता ते सांगवी गावाच्या रस्त्याने घरी वरखेडी येथे येत होते. त्याचवेळी सांगवी, बरखेडी शिवरस्त्याच्या नाल्याला अचानकपणे मोठा पुर आला. या पुराच्या पाण्यात सतीश चौधरी हे वाहून गेले.

आज सकाळी वरखेडी बाजारपेठेतील शनी मंदिराजवळ पुराच्या पाण्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. तेव्हा गावकऱ्यांनी पुराच्या पाण्यात जाऊन पाहिले असता तो मृतदेह सतीश मोहन चौधरी यांचा असल्याचे उघड झाले. ही वार्ता वरखेडी गावात पसरताच वरखेडी गावावर शोककळा पसरली असून मयत सतीश चौधरी यांच्या पाश्चात्य आई, पत्नी व दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.

मयत सतीश मोहन चौधरी हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांचे वडीलही पोस्ट विभागात पोस्टमन म्हणून काम करत होते. त्यांच्या पाश्चात्य सतीश चौधरी यांनी ते काम सांभाळले होते. सतीश चौधरी यांच्या या निधनाची बातमी कळताच वरखेडी गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

दरम्यान, सतीश मोहन चौधरी हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या पाश्चात्य आई, पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार असल्याने त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---