तरुण भारत लाईव्ह । ४ सप्टेंबर २०२३। पाचोऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नऊ वर्षाच्या मुलीवर नात्यातल्याच १८ वर्षाच्या युवकाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. प्रकरणी या नराधमाला अटक केली असून त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रानुसार, नऊ वर्षीय मुलीचे आईवडील बाहेरगावी गेले होते म्हणून मुलीला त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या नातेवाईकांकडे ठेवण्यात आले होते. रविवारी मुलगी आणि तिचा नातलग घरी एकटेच होते. याचाच फायदा घेऊन त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलीने ही घडलेली घटना घरच्यांना सांगितली यानंतर पिडीतेच्या आईने पोलीस स्टेशनात धाव घेऊन आरोपीविरोधात तक्रार केली यानंतर लगेचच आरोपीविरोधात गुन्हा दाखल होऊन तत्काळ त्याला अटक करण्यात आली.