खळबळजनक : ६ वर्षीय बेपत्ता बालकाचा मृतदेह शेजारील घरात सापडला

---Advertisement---

 

यावल : शहरातील बाबूजी पुरा भागात शुक्रवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी एक ६ वर्षीय बालक बेपत्ता झाला होता. आज शनिवारी (६ सप्टेंबर) रोजी त्याचा मृतदेह शेजारील घरात सापडला. ही घटना समजताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, संतप्त जमावाने संशयिताच्या दुकानावर दगडफेक केली. यामुळे शहरातील दुकाने बंद करण्यात आली असून, दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

बाबूजीपुरा परिसरातील रहिवासी असलेले मजीद खान जनाब यांचा मुलगा मोहम्मद हन्नान खान (वय ६) हा शुक्रवारी (५ सप्टेंबर ) सायंकाळी सहाच्या सुमारास बेपत्ता झाला होता. मुलगा बेपत्ता झाल्याने त्याच्या नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी त्याची शोधाशोध सुरु केली. परंतु, तो कुठेच आढळून आला नाही. आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास हन्नानचा मृतदेह त्याच्याच शेजारी राहणाऱ्या बिस्मिल्ला खलीफा दस्तगीर खलीफा यांच्या दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर एका कोठीत आढळून आला.

घटनेची बातमी समजताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. घटनास्थळी गर्दी जमा झाली. या गर्दीच्या नियंत्रणासाठी व त्यांना शांत करण्यासाठी डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, हाजी शब्बीर खान, तसेच मुस्लिम समाजातील मान्यवरांनी प्रयत्न केले.

परंतु, जमावाचा रोष काही कमी झाला नाही. यावेळी संतप्त जमावाने बिस्मिल्ला खलीफा यांच्या मेन रोडवरील दुकानावर दगडफेक केली. या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली आहेत. यानंतर पोलिसांनी तात्काळ दंगा नियंत्रण पथकाला पाचारण केले.

फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल होत असून, बाबूजी पुरा परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या संपूर्ण यावल शहरात तणावाचे वातावरण असून, पोलिस सतर्क आहेत. स्थानिक नागरिक आणि समाजातील प्रतिनिधी या घटनेचा तीव्र निषेध करत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---