---Advertisement---
पुणे : जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एका दर्ग्याची दुरुस्ती केली जात होती. यात एक भिंत कोसळली. भिंत कोसळतच तेथे एक बोगदा सापडला. या घनतेनंतर हिंदू व मुस्लिम संघटनांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी खबरदारी म्हणून घटनास्थळी सुरक्षा दल तैनात केले आहे. या प्रकरणाची पुरातत्व विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. हिंदू संघटना चौकशीची मागणी केली आहे. तसेच मुस्लिम संघटना दर्ग्याला झालेल्या नुकसानीबद्दल रोष व्यक्त केला आहे.
शुक्रवारी आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे नवा वाद उफाळून आला. मंचरच्या चावडी चौकात एक दर्गा आहे. या दर्ग्याची दुरुस्ती करण्याचे काम करण्यात येत आहे. या दरम्यान, सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दर्ग्याची एक भिंत कोसळली. भिंत कोसळतच आतमध्ये बोगद्या दिसून आला. यामुळे परिसरात एक गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन हिंदू-मुस्लिम गट आमनेसामने आले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक नगर परिषदेने दुरुस्तीसाठी सुमारे ६० लाख रुपये मंजूर केले होते. तथापि, या बांधकामासाठी सर्व अधिकृत परवानग्या घेतल्या गेल्या होत्या का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. घटनेनंतर तणाव वाढू नये म्हणून मंचर शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
अधिकाऱ्यांनी नंतर सांगितले की, न्यायालयाच्या आदेशापर्यंत पुढील बांधकाम केले जाणार नाही. तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून शांतता राखण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम समुदायाच्या नेत्यांसोबत बैठका घेण्यात आल्या. दुसरीकडे, हिंदू संघटनांनी भिंतीच्या आतून बाहेर पडलेल्या बोगद्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे आणि सत्य बाहेर आणण्याचा आग्रह धरला आहे. आता या भागात लोकांच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे आणि कोणालाही प्रवेश दिला जात नाही. यासोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने येथे पाळत ठेवण्यात येत आहे.