---Advertisement---
ओडिशाच्या नयागढ जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघड झाली आहे. मदरशात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थी फरनरुद्दीन खान याला निर्घृणपणे ठार करण्यात आले. फरनरुद्दीन खान हा मूळचा कटक जिल्ह्यातील अठगढ येथील रहिवासी होता. तो नयागढ जिल्ह्यातील नीलापल्ली येथील एका मदरशात शिक्षण घेत होता. पोलिस तपासात असे आढळून आले आहे की त्याच मदरशातील काही वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून फरनरुद्दीनचे लैंगिक शोषण केले जात होते. विद्यार्थ्याने ही बाब उघड करण्याची धमकी दिल्यावर त्याची निर्घृण हत्या केली.
पीडित मुलाच्या वडिलांनी राजसुखला पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. यानंतर रविवारी (३१ ऑगस्ट ) रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास दोन वरिष्ठ विद्यार्थ्यांनी फरनरुद्दीनवर लैंगिक अत्याचार केले. यानंतर त्याला मदरशाच्या बंद शौचालयाच्या टाकीत फेकून देण्यात आले. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला आणि शरीराच्या अनेक भागांना गंभीर दुखापत झाली. हल्लेखोरांना वाटले की तो मरण पावला आहे. मात्र, तो त्याच रात्री त्या टाकीतून पळून जाण्यात यशस्वी झाला.
एक दिवसानंतर, म्हणजे मंगळवारी (२ सप्टेंबर) रोजी सकाळी ११ वाजता, आरोपी सहविद्यार्थी त्याला पुन्हा त्याच टाकीत घेऊन गेले. पण यावेळी आणखी तीन आरोपी आधीच तिथे उपस्थित होते. तिथे या पाच जणांनी मिळून फरानरुद्दीनवर पुन्हा लैंगिक अत्याचार केले आणि त्याचा गळा दाबून खून करण्यात आला. त्यानंतर, त्याच शौचालयाच्या टाकीत त्याचा मृतदेह टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
वैज्ञानिक तपास पथकाने या प्रकरणात घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. साक्षीदारांचे जबाब आणि सीसीटीव्ही फुटेजवरून पाच अल्पवयीन विद्यार्थी हत्येमध्ये आणि लैंगिक अत्याचारात सहभागी असल्याचे पुष्टी झाली. त्या सर्वांविरुद्ध पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस चौकशीदरम्यान सर्व आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. त्यांचे सर्व जन्म प्रमाणपत्र जप्त करण्यात आले आहेत आणि त्यांची नावे मदरशातून काढून टाकण्यात आली आहेत. त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे.