तरुण भारत लाईव्ह ।०८ फेब्रुवारी २०२३। साठ वर्षीय वयोवृद्धाने घरी अभ्यासाला बोलवून दोन चिमुकलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंब्रा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.
सूत्रानुसार, ठाणे येथे ओंकार नगर परिसरात राहणाऱ्या साठ वर्षीय वयोवृद्धाने एकाच घरातील दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केले. या दोन्ही चिमुकल्या सख्ख्या बहिणी आहेत. आरोपीने दोघी बहिणींना खाऊ देण्याचे आमिष दाखवत आपल्या घरी अभ्यासाला बोलावुन त्यांना अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक चाळे करण्यास सुरुवात केली, त्यानंतर एवढ्यावरच न थांबता त्या चिमुकलीला व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे दिसतंय त्याप्रकारे सर्व करण्यासाठी भाग पाडून लैंगिक चाळे करत दोन्ही चिमुकलींसोबत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
आपल्यासोबत झालेली हि घटना चिमुकलींनी घरी आपल्या आईला सांगितल्यानंतर उघडकीस आला. या प्रकरणी पीडित मुलींच्या आईने मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेत या ६० वर्षीय विकृत नराधमाविरोधात ६ फेब्रुवारी २०२३ रोजी गुन्हा दाखल केला आहे. मुंब्रा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीविरुद्ध अल्पवयीन तथा बालकांसोबत लैंगिक अत्याचार, या अंतर्गत गुन्हा दाखल केले आहेत. तसेच त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.