तरुण भारत लाईव्ह । ६ एप्रिल २०२३। मुंबईमधुन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका १३ वर्षीय तरुणाने फक्त मनासारखे केस कापले नाही म्हणून १६व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या भाईंदरमध्ये हा प्रकार घडला असून इथे एका १३ वर्षाय मुलाने यासाठी आपलं जीवन संपवलं की त्याच केस खूप छोटे कापले आणि ते त्याच्या मनासारखे कापले नव्हते. याचा त्याला इतका राग आला की त्याने रागात आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं. मंगळवारी ही घटना घडली. मंगळवारी, मृत तरुणाच्या काकाच्या मुलाने त्याचे शॉर्ट हेअर केले. ज्यामुळे तो खूप नाराज झाला आणि याचा त्याला खूप रागही आला होता. यामुळे तो मंगळवारी रात्री सगळं कुटुंब झोपल्यानंतर बाथरुममध्ये गेला. तिथे त्याने खिडकी उघडून खाली उडी मारली.
सगळ्यात भयंकर म्हणजे या १३ वर्षीय चिमुरड्याने १६व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना घडल्यानंतर याची पोलीस तक्रार करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.