---Advertisement---

अमेरिका हादरली! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोराचं उडवलं डोकं

---Advertisement---

अमेरिकत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु असून मात्र त्याचदरम्यान एक खळबळजनक घटना समोर येत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी गोळीबार झाला. निवडणुकीच्या रॅलीत अचानक त्यांच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात झाली. यातील एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला घासून गेलीय. ट्रम्प यांच्या कानाजवळून रक्त वाहत होतं. या घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान सुरक्षारक्षकांनी गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला ठार केलं. शूटरने जिथून गोळीबार केला त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत असून त्या पार्श्वभूमीवर प्रचार रॅली सुरू आहेत. याच प्रचार रॅलीवेळी ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये रॅलीच्या ठिकाणापासून जवळ असणाऱ्या एका उंच ठिकाणाहून व्यासपीठाच्या दिशेने अनेक गोळ्या झाडल्या गेल्या.
https://twitter.com/BNONews/status/1812279693472661855
बीएनओ न्यूजने एक व्हिडीओओ शेअर केला असून त्यात शूटरने ट्रम्प यांच्यावर कुठून गोळीबार केला ते दिसत आहे. ट्रम्प यांच्यावर हल्लेखोराने जवळच्या एका इमारतीच्या छतावरून गोळ्या झाडल्या. व्हिडीओमध्ये हल्लेखोर इमारतीच्या छतावर आडवा पडल्याचं दिसतंय. हल्ल्यानंतर रॅलीमध्ये गोंधळ उडाला. ट्रम्प यांना दुखापत झाली असून त्यांच्या कानाच्या खालच्या भागाला गोळी लागली आहे. कानातून रक्त वाहत असल्याचंही दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment