Shooting attack Chalisgaon: चाळीसगाव भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर बुधवार सात जानेवारी रोजी दुपारी हनुमान वाडी परिसरात पाच संशयित आरोपींनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. गंभीर जखमी झालेल्या महेंद्र मोरे यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू होते शुक्रवारी रात्री उपचारात दरम्यान मोरे यांचा मृत्यू झाला .
यामुळे चाळीसगाव तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. गोळीबार प्रकरणी अजय संजय बैसाणे [वय 31 वर्ष रा.लक्ष्मी नगर बस स्टँडच्या पाठीमागे चाळीसगाव] यांच्या फिर्यादी वरून गुड्डू शिंदे [रा. हिरापूर] सचिन गायकवाड [रा. चाळीसगाव ]आणि शेख उर्फ नव्या शरीफ शेख [आनंद हुडको कॉलनी चाळीसगाव] सॅम चव्हाण [रा. हिरापूर ], भूपेश सोनवणे [रा. चाळीसगाव ] सुमित भोसले [रा. चाळीसगाव], संतोष निकुंभ [रा. हिरापूर] यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता