जळगाव महापालिकेच्या महाबळ युनिट कार्यालयाच्या शाखा अभियंत्यांसह 23 दांडीबहाद्दारांना ‌‘शोकॉज‌‘

जळगाव : महापालिकेच्या महाबळ युनिट कार्यालयातील शाखा अभियंता संजय पाटील यांच्यासह 23 कर्मचाऱ्यांना आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांनी शोकॉज नोटीस बजावली आहे. आयुक्तांनी केलेल्या अचानक पाहणीत कार्यालय कुलूपबंद आढळल्याने आयुक्तांनी ही कारवाई केली.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांनी कार्यालयीन वेळेत महापालिकेच्या महाबळ युनिट कार्यालयाला अचानक भेट दिली. त्यावेळी कार्यालयास कुलूप आढळून आले. शाखा अभियंता संजय पाटील व इतर कर्मचारी उपस्थित नसल्याने व युनिट कार्यालयास कुलूप आढळून आल्याने संतप्त झालेल्या आयुक्तांनी या सर्वांना शोकॉज नोटीसा बजावल्यात. सर्वांना कर्तव्यात कसूर केली म्हणून बेजबाबदारीबद्दल तातडीने विभाग प्रमुख यांच्या अभिप्रायासह खुलासा मागवत शिस्तंभगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

यांना बजावल्यात शोकॉज नोटीसा
शाखा अभियंता संजय पाटील, जगन्नाथ महाजन, विशाल चौधरी, संतोष पाटील, शांताराम नारखेडे, भगवान तायडे, जयदेव चौधरी, रतिलाल सपकाळे, गणेश सोनार, कपूरसिंग जाधव, गोपाल महाजन, विजय पाटील, हरी मते, अशोक पाटील, गोकुळ तायडे, सुहास पाटील, अशोक मराठे, सुनील गवळी, प्रकाश पाटील, संदीप पाटील, शिवपाल सपकाळे, लक्ष्मण गवळी व कैलास सपकाळे यांचा समावेश आहे.