Shrikant Shinde emotional post : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. दोन दिवसांपासून सुरू असलेला मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्सही एकनाथ शिंदे यांनी काल संपून टाकला. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी-शहा मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतील, तो मला मान्य असल्याचे स्पष्ट केलं. यानंतर श्रीकांत शिंदे यांनी वडील (एकनाथ शिंदे) यांच्याबद्दल एक्सवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
महाराष्ट्रात महायुतीने भूतो न भविष्यती अशी कामगिरी करून दाखवली. महायुतीचे वारू उधळले. या लाटेत महाविकास आघाडी भुईसपाट झाली. महाविकास आघाडीचा 50 जागांच्या आत खेळ आटोपला. तर महायुतीने 230 हून अधिकचा मॅजिक फिगर गाठला. त्यात भाजपाला 132 जागांवर यश आले. भाजपा मोठा भाऊ ठरला. त्यानंतर शिंदे सेनेला 57, अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. आता सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.
दोन दिवसांपासून सुरू असलेला मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्सही एकनाथ शिंदे यांनी काल संपून टाकला. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी-शहा मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतील, तो मला मान्य असल्याचे स्पष्ट केलं. यानंतर श्रीकांत शिंदे यांनी वडील (एकनाथ शिंदे) यांच्याबद्दल एक्सवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
https://x.com/DrSEShinde/status/1861820823272620488
काय आहे श्रीकांत शिंदेंची भावनिक पोस्ट ?
मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला ‘सीएम’ म्हणजे ‘कॉमन मॅन’ समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.
कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री. अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे.
सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर – गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे.
खूप अभिमान वाटतो बाबा!