जळगाव जिल्ह्यात घडले पट्टेदार वाघाचे दर्शन

जळगाव : मुक्ताई भवानी व्याघ्र प्रकल्प व यावल अभयारण्यात वन्यजीव, प्रादेशिक विभागात प्राणी गणना करण्यात आली होती. यावेळी मुक्ताई व्याघ्र प्रकल्पात चक्क पट्टेदार वाघाचे दर्शन घडले. याशिवाय १५० पेक्षा विविध प्रकारचे प्राणी दिसून आले.

वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल वनरक्षक यांनी काम केले. हेमराज पाटील, चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे संकेत पाटील, अंकित पाटील, (रावेर), डॉ. अविनाश गवळी (भुसावळ), पराग चौधरी, मनीष चव्हाण (पाल), कल्पेश खत्री (फैजपूर), लंगडा आंबा वनपाल समाधान करंज, वनरक्षक अब्दुल तडवी, जामन्या वनपाल पाटील, वनरक्षक अजय चौधरी, वन्यजीवचे वनपाल संभाजी सूर्यवंशी यांनी गणनेत सहभाग घेतला.

या ठिकाणी गणना
वायला, कोयला, भट्टी, बारी, भाटी, धरण, भाऊ कुटी, बंधारा लोखंडी मचान या ठिकाणी मचाणी उभारून ही गणना करण्यात आली.

हे प्राणी आढळले 

चिंकारा ९, वानर ११, लांडगा ८, भेकर १, नीलगाय १, बट १, ससा ६, मोर १५, कोल्हा १२, रान मांजर ७, तरस ७, रानडुक्कर ७, उदमांजर २, हरीण १५ आढळून आले. तर रान डुक्कर ४, कोल्हे ५, अस्वल १, मोर ३, रान ससे २, जामन्या वनपरिक्षेत्रात हरीण ६, अस्वल १, मोर ५, माकड १०, कोल्हे २ आढळले.